AUS vs NZ ICC World Cup 2023: धर्मशालेत आले धावांचे वादळ, विश्वचषकात मोडला गेला षटकारांचा महान विक्रम
David Warner and Travis Head (Photo Credit - Twitter)

विश्वचषक 2023 च्या 27 व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड (AUS vs NZ) आमनेसामने आहेत. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी हा निर्णय चुकीचा ठरवला आणि रेकॉर्डब्रेक धावा केल्या. दुखापतीतून परतलेला ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि ट्रॅव्हिस हेडने पहिल्या पॉवरप्लेमध्ये चौकार आणि षटकार ठोकले. (हे देखील वाचा: Australia T20 Squad vs India: ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघ केला जाहीर, विश्वचषक खेळणाऱ्या 8 खेळाडूंचा समावेश)

षटकारांचा हा महान विक्रम विश्वचषकात मोडला गेला

डेव्हिड वॉर्नर-ट्रॅव्हिस हेडने पॉवरप्लेमध्येच ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 118 धावांवर नेली. विश्वचषकाच्या इतिहासातील हा दुसरा सर्वोच्च पॉवरप्ले स्कोअर आहे. त्याचवेळी, वनडे विश्वचषक स्पर्धेत सलामीच्या जोडीने पहिल्या 10 षटकांत एवढी मोठी धावसंख्या उभारण्याची ही पहिलीच वेळ आहे. यादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी पॉवरप्लेमध्ये 10 षटकार ठोकले. वर्ल्डकपमध्ये पॉवरप्लेमध्ये संघाने 10 षटकार मारण्याची ही पहिलीच वेळ आहे. या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 9 षटकार ठोकले होते.

वर्ल्ड कपमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा संघ

ऑस्ट्रेलिया - 10 षटकार -  न्यूझीलंड विरुद्ध

श्रीलंका - 9 षटकार - दक्षिण आफ्रिका विरुद्द

न्यूझीलंड - 7 षटकार - इंग्लंड विरुद्ध

वेस्ट इंडिज - 7 षटकार - न्यूझीलंड विरुद्ध

वेस्ट इंडिज - 7 षटकार - कॅनडा विरुद्ध

विश्वचषक 2023 मधील सर्वात वेगवान अर्धशतक

या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने 25 चेंडूत अर्धशतक झळकावले. या दमदार खेळीनंतर ट्रॅव्हिस हेड या विश्वचषकात सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कुसल मेंडिससह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याचवेळी डेव्हिड वॉर्नरनेही येथे आपले अर्धशतक पूर्ण करण्यासाठी केवळ 28 चेंडूंचा सामना केला. डेव्हिड वॉर्नर 65 चेंडूत 81 धावांची तर ट्रॅव्हिस हेडने 67 चेंडूत 109 धावांची खेळी खेळल्यानंतर बाद झाला.