भारताविरुद्ध 23 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. विशेष बाब म्हणजे सध्या आयसीसी विश्वचषक संघाचा भाग असलेल्या 8 खेळाडूंना भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळाले आहे. ऑस्ट्रेलियाने शनिवारी (28 ऑक्टोबर) आपल्या संघाची घोषणा केली आणि यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडला संघाचा कर्णधार बनवले. याशिवाय डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस आणि अॅडम झाम्पा या स्टार खेळाडूंचाही या संघात समावेश आहे.
भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ
ऑस्ट्रेलिया टी-20 संघ: मॅथ्यू वेड (कर्णधार), जेसन बेहरेनडॉर्फ, सीन अॅबॉट, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झंपा.
SQUAD! There's more cricket to come in India next month, with Matthew Wade set to lead this talented bunch in five T20I's against India #INDvAUS pic.twitter.com/Mqc8cLe5Ur
— Cricket Australia (@CricketAus) October 28, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)