
AFG vs SL Live Streaming: आशिया कप २०२५ मधील ११ वा सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्यातून सुपर-४ मध्ये पोहोचणारी चौथी टीम निश्चित होईल. श्रीलंका संघाने आधीच सुपर-४ साठी जवळपास पात्रता मिळवली आहे, तर अफगाणिस्तानसाठी हा सामना 'करो वा मरो'चा असणार आहे. या सामन्याच्या निकालावर बांगलादेशचेही भवितव्य अवलंबून आहे. (हे देखील वाचा: PAK vs UAE: कोणाचा राग कोणावर? पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्यात मारला चेंडू, पाहा VIDEO)
अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना कधी आणि कुठे?
- ठिकाण: हा सामना अबू धाबी येथील शेख जायद क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
- वेळ: भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता या सामन्याची सुरुवात होईल, तर टॉस ७:३० वाजता होईल.
सुपर-४ ची समीकरणे
ग्रुप बी च्या गुणतालिकेत श्रीलंका ४ गुणांसह अव्वल स्थानी आहे. बांगलादेशचेही ४ गुण आहेत, पण त्यांचा नेट रन रेट -०.२७० आहे. तिसऱ्या स्थानावर असलेल्या अफगाणिस्तानकडे २ गुण आहेत, पण त्यांचा नेट रन रेट २.१५० असा सर्वोत्तम आहे. त्यामुळे, सुपर-४ मध्ये पोहोचण्यासाठी अफगाणिस्तानला केवळ विजयाची गरज आहे. जर त्यांनी हा सामना जिंकला, तर ते थेट ग्रुपमध्ये अव्वल स्थान मिळवू शकतात. मात्र, जर अफगाणिस्तानचा पराभव झाला, तर ते स्पर्धेतून बाहेर होतील आणि श्रीलंका-बांगलादेश सुपर-४ मध्ये पोहोचतील.
कुठे पाहू शकता थेट प्रक्षेपण?
अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील या महत्त्वपूर्ण सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी लिव्ह ॲप (SonyLIV App) आणि वेबसाइटवर पाहता येईल. तसेच, टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर (Sony Sports Network) या सामन्याचे थेट प्रसारण केले जाईल.
दोन्ही संघांचे स्क्वॉड
अफगाणिस्तान: सेदिकुल्लाह अटल, रहमानुल्लाह गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम जादरान, मोहम्मद नबी, गुलबदीन नैब, अजमतुल्लाह उमरजई, करीम जनत, राशिद खान (कर्णधार), नूर अहमद, एएम गजनफर, फजलहक फारूकी, फरीद अहमद मलिक, अब्दुल्ला अहमदजई, मोहम्मद इशाक, मुजीब उर रहमान, दरविश रसूली, शराफुद्दीन अश्रफ.
श्रीलंका: चरिथ असलंका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, कुसल परेरा, नुवानीदु फर्नांडो, कामिंडु मेंडिस, कामिल मिशारा, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, डुनिथ वेललागे, चमिका करुणारत्ने, महीश थीक्षाना, दुशमंथा चमीरा, बिनुरा फर्नांडो, नुवान तुषारा, मथीशा पथिराना.