भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना मंगळवारी नेपियर येथे खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना पावसाने वाहून गेला होता. वेलिंग्टन येथे झालेल्या पहिल्या टी-20 मध्ये टॉस देखील होऊ शकला नाही. त्याचवेळी दुसऱ्या टी-20 मध्ये भारतीय संघाने 65 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. आता भारतीय संघ मालिका गमावू शकत नाही, पण मालिका काबीज करण्यासाठी शेवटचा सामना जिंकावा लागेल. तसेच हा सामना तुम्ही कुठे पाहू शकता त्या बद्दल ही माहिती जाणून घ्या...(हे देखील वाचा: IND vs NZ 3rd T20 Weather Report: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील निर्णायक सामन्यात कसे असेल हवामान, वाचा खेळपट्टीचा अहवाल)
भारत आणि न्यूझीलंडमधील तिसरा सामना कधी आणि कुठ खेळवला जाणार आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा टी-20 सामना 22 नोव्हेंबरला म्हणजेच मंगळवारी होणार आहे. तसेच हा सामना नेपियरच्या मॅक्लीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना कधी सुरू होईल?
भारत आणि न्यूझीलंड सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता सुरू होईल. सकाळी साडेअकरा वाजता नाणेफेक होईल.
सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर प्रसारित होईल?
डीडी स्पोर्ट्सकडे न्यूझीलंड दौऱ्यावर भारताचे टी-20 सामने प्रसारित करण्याचे अधिकार आहेत. हे फक्त डीडी फ्री डिशवर आहे. तुम्ही डीडी स्पोर्ट्सवर डीडी फ्री डिशवर सामन्याचा आनंद घेऊ शकता.
फोन किंवा लॅपटॉपवर लाईव्ह मॅच कुठे पाहणार?
भारतातील Amazon Prime Video अॅपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.