IND vs WI 3rd T20I: युजवेंद्र चहल ला वानखेडे सामन्यात भारताचा सर्वश्रेष्ठ गोलंदाज बनण्याची संधी, 'हा' नकोश्या रेकॉर्डचीही होऊ शकते नोंद
युजवेंद्र चहल (Photo Credit: Getty Images)

भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) मधील तिसरा आणि निर्णायक टी-20 सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) मध्ये खेळला जाईल. दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी दडपण असणार आहे. दोन्ही संघ सध्या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहे. मुंबईतील सामना जिंकत दोन्ही संघ मालिका जिंकण्याचा प्रयत्न करतील. या मॅचमध्ये टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) टी-20 मध्ये विशेष विक्रम नोंदवू शकतो. या सामन्यात विकेट घेताच चहल टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनेल. हैदराबाद सामन्यात टी-20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चहल संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर पोहचला होता. पण दुसऱ्या सामनात त्याला एकही विकेट मिळाली नाही, त्यामुळे तेव्हा त्याची ती संधी हुकली. चहलने 36 आंतरराष्ट्रीय टी -20 सामन्यांत 52 विकेट घेतले आहेत आणि सध्या रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याच्यासह तो संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे. (KulCha सह रोहित शर्मा याचा रॅपिड फायर, हिटमॅनच्या प्रश्नांना कुलदीप यादव-युजवेंद्र चहल ने दिले मजेशीर उत्तरं, पाहा Video)

फक्त एवढेच नव्हे तर चहल बांग्लादेशचा अष्टपैलू शाकिब उल हसन यालाही पिछाडीवर टाकेल किंवा त्याच्यासह संयुक्तपणे या अवांछित यादीमध्ये बरोबरी करेल. चहलने आतापर्यंतच्या छोट्या स्वरूपात 64 षटकार ठोकले आहेत. जर त्याला आणखी एक षटकार ठोकला तर शाकीबसह तो बरोबरी करेल. जर त्याच्या गोलंदाजीवर एकापेक्षा जास्त षटकार बसला तर चहल या अवांछित यादीत अव्वल स्थान मिळवेल. यावर्षी टी-20 चा गोलंदाजीची सरासरी 39.25 आहे जी त्याच्या कारकीर्दीतील सर्वात वाईट आहे.

हैदराबादमधील सामन्यात विंडीजने दिलेल्या 208 धावांचे मोठे लक्ष्य टीम इंडियाने फक्त 6 विकेट गमावून गाठले. पण, दुसऱ्या सामन्यात संघाला विजयी रथ कायम ठेवता आले आणि विंडीजने अष्टपैलू कामगिरी करत 8 विकेटने विजय मिळवला आणि मालिकेत बरोबरी साधली. आता दोन्ही संघांपैकी ही मालिका कोण जिंकेल याचा निर्णय मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होईल.