टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजीची जोडी कुलदीप यादव (Kuldeep Yadav) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध सुरु असलेल्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाचा (Indian Team) एक भाग आहे. यावर्षी ऑगस्टमधील वेस्ट इंडीज दौर्यानंत पहिल्यांदा या दोघांचा एकत्र भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. चहल आणि कुलदीप या दोघांनी अलिकडच्या काळात टीम इंडियासाठी चांगली कामगिरी केली आहे. चहलला विंडीजविरुद्ध पहिल्या दोन्हीटी-20 मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली तर, कुलदीपला एकही सामना खेळता आला नाही. सहसा टीम इंडियाचा फिरकीपटू चहल टीमच्या उर्वरित खेळाडूंची मुलाखत घेताना दिसतो, पण आता भारतीय क्रिकेट संघाचा सलामी फलंदाज रोहित शर्मा याने ही जबाबदारी स्वीकारली असल्याचे दिसुन येत आहे. हैदराबादमधील पहिल्या मॅचआधी रोहितने 'कुलचा' च्या नावाने प्रसिद्ध या जोडीची मुलखात घेतली. या मुलाखतीत रोहितने विचारलेल्या काही प्रश्नांचे दोन्ही गोलंदाजांनी मजेदार अंदाजात उत्तरं दिली. (IND vs WI ODI 2019: टी-20 नंतर शिखर धवन वेस्ट इंडीजविरुद्ध वनडे मालिकेला मुकण्याची शक्यता, वाचा सविस्तर)
रोहितने कुलदीप आणि चहलला काही प्रश्नांचे एका शबदात उत्तर देण्यास सांगितले, तर संघातील एकाची नक्कल करण्यास सांगितले असताना चहलने रोहितची नक्कल केली. चहलचा अभिनय पाहून रोहितने तो खूप खराब अभिनय करतो असे म्हटले, तर कुलदीपने मोहम्मद शमी याची नक्कल केली. व्हिडिओच्या अखेरीस जेव्हा चहलने रोहितला त्याच्या क्लीन शेव बद्दल विचारले तेव्हा हिटमॅनने सांगितले की, त्याची लहान मुलगी समायराला त्याची दाढी नाही आणि दाढी असताना ती त्याच्यासोबत खेळत नाही. पाहा रोहितचा 'कुलचा' सोबतचा हा रॅपिड फायर व्हिडिओ:
MUST WATCH: Rapidfire ft. Kuldeep, Chahal and the HITMAN 😃😎
Many fun facts from the spin twins @yuzi_chahal & @imkuldeep18 on the questions curated by @ImRo45 🗣️ - by @RajalArora
Full Video Link here 📽️👉👉 https://t.co/taEVM9Prur pic.twitter.com/00aBUSmcV5
— BCCI (@BCCI) December 10, 2019
दरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेतील पहिले दोन्ही सामने भारत-वेस्ट इंडिजने जिंकत मालिकेत बरोबरी साधली आहे. आता दोन्ही संघातील अंतिम आणि निर्णायक सामान उद्या, 11 डिसेंबरला मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात येईल. तिरुवनंतपुरममध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने अष्टपैलू खेळी करत 8 विकेटने सामना जिंकला होता.