कोलकाता: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs ENG 1st T20I) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना आज म्हणजेच 22 जानेवारी रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर (Eden Gardens, Kolkata) खेळला जाईल. सूर्यकुमार यादवकडे (SuryaKumar Yadav) भारतीय टी-20 संघाची कमान आहे. तर जोस बटलरकडे (Jos Buttler) इंग्लडं संघाचे नेतृत्व आहे. या मालिकेत सर्वांच्या नजरा मोहम्मद शमीवर (Mohammed Shami) असतील जो तंदुरुस्त होऊन पुनरागमन करत आहे. चाहत्यांना दोन्ही संघांमधील रोमांचक लढाई पाहता येईल. (हे देखील वाचा: Tilak Varma Milestone: इंग्लंडविरुद्ध तिसरे टी-20 शतक झळकावून तिलक वर्मा इतिहास रचणार का? बनू शकतो एक विशेष कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज)
ईडन गार्डन्सवर इंग्लंड कधीही हरला नाही
भारत आणि इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकूण 24 टी-20 सामने खेळले गेले आहेत. या काळात भारताने 13 वेळा विजय मिळवला आहे. तर इंग्लंडने 11 वेळा विजय मिळवला आहे. तथापि, भारताला आतापर्यंत ईडन गार्डन्सच्या मैदानावर इंग्लंडला हरवता आलेले नाही. आतापर्यंत या मैदानावर दोन्ही संघांमध्ये दोन सामने झाले आहेत आणि दोन्ही वेळा इंग्लंडने विजय मिळवला आहे.
GET. SET. SIX FEST. 🔥
Less than 24 hours to go! Predict the scoreline for the 5-match #INDvENG T20I series! ✍#INDvENGonJioStar 👉 1st T20I | WED, JAN 22, 6 PM on Disney+ Hotstar & Star Sports! | #KhelAasmani pic.twitter.com/PYWOrvP1iT
— Star Sports (@StarSportsIndia) January 21, 2025
किती वाजता सुरु होणार सामना?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना बुधवार, 22 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.00 वाजता कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे खेळला जाईल.
जाणून घ्या स्ट्रीमिंगची संपूर्ण माहिती
भारत-इंग्लंड टी-20 मालिका भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित केली जाईल. याशिवाय, या मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने प्लस हॉटस्टारवर उपलब्ध असेल. याशिवाय, भारतात हा सामना डीडी फ्री डिशवर मोफत दाखवला जाईल, तर चाहते जिओ टीव्हीवरही सामना पाहू शकतील.
इंग्लंडची प्लेइंग 11: बेन डकेट, फिलिप साल्ट (विकेटकीपर), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड
भारताची संभाव्य प्लेइंग 11: संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.