Legends League Cricket 2024: लेजेंड्स लीग क्रिकेटला 2024 (Legends League Cricket 2024) शुक्रवारपासून सुरु होणार आहे. नवीन हंगामाचा पहिला सामना 20 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. स्पर्धेचा पहिला टप्पा जोधपूरच्या बरकतुल्ला खान स्टेडियमवर खेळवला जाईल. संपूर्ण स्पर्धा जोधपूर, सुरत, जम्मू आणि श्रीनगरमध्ये चार टप्प्यात खेळवली जाणार आहे. सहा संघांच्या स्पर्धेचा अंतिम सामना 16 ऑक्टोबर 2024 रोजी श्रीनगरच्या बक्षी स्टेडियमवर होणार आहे. स्पर्धेत ऐकुन सहा संघ आहे. दक्षिणी सुपरस्टार्स, अर्बनरायझर्स हैदराबाद, मणिपाल टायगर्स, गुजरात जायंट्स, इंडिया कॅपिटल्स आणि कोणार्क सूर्यास ओडिशा.
कधी अन् कुठे पाहणार सामना?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर चाहते लीजेंड्स लीग क्रिकेटचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. तुम्ही Disney + Hotstar, Fan Code वर लाइव्ह स्ट्रीमिंग देखील पाहू शकता. (हे देखील वाचा: ICC T20I Rankings: आयसीसी टी-20 क्रमवारीत भयानक उलथापालथ, लियाम लिव्हिंगस्टोनने पटकावले अव्वल स्थान)
सर्व सहा संघाचे खेळाडू
गुजरात संघ
ख्रिस गेल, लियाम प्लंकेट, मॉर्न वॅन विक, लेंडल सिमन्स, असोहर अफोहान, जेरोम टेलर, पारस खाडा, सीकुगे प्रसन्ना, कामाऊ लेव्हररॉक, सायब्रँड एनोएलब्रेक्ट, शॅनन गॅब्रिएल, समर क्वाद्री, मोहम्मद कैफ, श्रीशांत, आणि शिकहरवान.
कोणार्क सूर्य ओडिशा
इरफान पठाण, युसूफ पठाण, केविन ओब्रायन, रॉस टेलर, विनय कुमार, रिचर्ड लेवी, दिलशान मुनावीरा, शाहबाज नदीम, फिडेल एडवर्ड्स, बेन लाफलिन, राजेश बिश्नोई, प्रवीण तांबे, दिवेश पठानिया, केपी अप्पाण्णा, अंबाती रायुडू, आणि नवोदित .
मणिपाल टायगर्स
हरभजन सिंग, रॉबिन उथप्पा, थिसारा परेरा, शेल्डन कॉट्रेल, डॅन ख्रिश्चन, अँजेलो परेरा, मनोज तिवारी, असाला गुणरत्ने, सोलोमन मिरे, अनुरीत सिंग, अबू नेचिम, अमित वर्मा, इम्रान खान, राहुल शुक्ला, अमितोज सिंग, प्रवीण गुप्ता आणि सौरभ तिवारी
इंडिया कॅपिटल्स
ऍशले नर्स, बेन डंक, ड्वेन स्मिथ, कॉलिन डी ओरंडहोम, नमन ओझा, धवल कुलकर्णी, ख्रिस मपोफू, फैज फझल, इक्बाल अब्दुल्ला, किर्क एडवर्ड्स, राहुल शर्मा, पंकज सिंग, ज्ञानेश्वर राव, भरत चिपली, परविंदर अवाना, पवन सुयाल, मुरली विजय आणि इयान बेल
🚨Here we go 🚨
Meet the legends who will call the shots at the #BossLogonKaGame 👊
Get your tickets now on @insider_in_
Watch live on @StarSportsIndia & @FanCode #BossLogonKaGame #LegendsLeagueCricket #LLCseason3 #LLCT20 pic.twitter.com/xBxEtwJKWL
— Legends League Cricket (@llct20) September 17, 2024
दक्षिणी सुपरस्टार्स
दिनेश कार्तिक, एल्टन चिगुम्बुरा, हॅमिल्टन मसाकादझा, पवन नेगी, जीवन मेंडिस, सुरंगा लकमल, श्रीवत्स गोस्वामी, हमीद हसन, नॅथन कुल्टर नाईल, चिराग गांधी, सुबोथ भाटी, रॉबिन बिस्ट, जेसल कारी, चतुरंगा डी सिल्वा आणि मोनू कुमार.
हैदराबाद संघ
सुरेश रैना, गुरकीरत सिंग, पीटर ट्रेगो, समिउल्ला शिनवारी, जॉर्ज वर्कर, इसुरु उडाना, रिक्की क्लार्क, स्टुअर्ट बिन्नी, जसकरण मल्होत्रा, चॅडविक वॉल्टन, बिपुल शर्मा, नुवान प्रदीप आणि योगेश नागर.
लेजेंड्स लीग क्रिकेट 2024 पूर्ण वेळापत्रक
जोधपूर
20 सप्टेंबर 2024: कोणार्क सूर्य ओडिशा विरुद्ध मणिपाल टायगर्स
21 सप्टेंबर 2024: इंडिया कॅपिटल्स विरुद्ध हैदराबाद संघ
22 सप्टेंबर 2024: मणिपाल टायगर्स विरुद्ध गुजरात संघ
23 सप्टेंबर 2024: दक्षिणी सुपरस्टार्स विरुद्ध गुजरात संघ
24 सप्टेंबर 2024: विश्रांतीचा दिवस
25 सप्टेंबर 2024: हैदराबाद संघ विरुद्ध दक्षिणी सुपरस्टार्स
26 सप्टेंबर 2024: दक्षिणी सुपरस्टार्स विरुद्ध गुजरात संघ
सुरत
27 सप्टेंबर 2024: कोणार्क सूर्य ओडिशा विरुद्ध मणिपाल टायगर्स
28 सप्टेंबर 2024: हैदराबाद संघ विरुद्ध गुजरात संघ
29 सप्टेंबर 2024: इंडिया कॅपिटल्स विरुद्ध कोणार्क सूर्या ओडिशा
30 सप्टेंबर 2024: इंडिया कॅपिटल्स विरुद्ध मणिपाल टायगर्स
1 ऑक्टोबर 2024: मणिपाल टायगर्स विरुद्ध दक्षिणी सुपरस्टार्स
2 ऑक्टोबर 2024: कोणार्क सूर्य ओडिशा विरुद्ध दक्षिणी सुपरस्टार्स
जम्मू
3 ऑक्टोबर 2024: मणिपाल टायगर्स विरुद्ध हैदराबाद संघ
4 ऑक्टोबर 2024: इंडिया कॅपिटल्स विरुद्ध कोणार्क सूर्या ओडिशा
5 ऑक्टोबर 2024: हैदराबाद संघ विरुद्ध गुजरात संघ
6 ऑक्टोबर 2024: इंडिया कॅपिटल्स विरुद्ध दक्षिणी सुपरस्टार्स
6 ऑक्टोबर 2024: कोणार्क सूर्य ओडिशा विरुद्ध हैदराबाद संघ
6 ऑक्टोबर 2024: इंडिया कॅपिटल्स विरुद्ध गुजरात संघ
8 ऑक्टोबर 2024: विश्रांतीचा दिवस
श्रीनगर
9 ऑक्टोबर 2024: हैदराबाद संघ विरुद्ध दक्षिणी सुपरस्टार्स
10 ऑक्टोबर 2024: इंडिया कॅपिटल्स विरुद्ध मणिपाल टायगर्स
11 ऑक्टोबर 2024: कोणार्क सूर्य ओडिशा विरुद्ध गुजरात संघ
12 ऑक्टोबर 2024: पात्रता (पोझिशन 1 विरुद्ध पोझिशन 2)
13 ऑक्टोबर 2024: एलिमिनेटर (पोझिशन 3 विरुद्ध पोझिशन 4)
14 ऑक्टोबर 2024: उपांत्य फेरी (पराभव पात्र वि विजेता एलिमिनेटर)
15 ऑक्टोबर 2024: विश्रांतीचा दिवस
16 ऑक्टोबर 2024: अंतिम (विजेता क्वालिफायर विरुद्ध विजेता उपांत्य फेरी).