KS vs MT (Photo Credit - LLC & X)

Legends League Cricket 2024: आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणारे दिग्गज खेळाडू आजपासून लिजेंड्स क्रिकेट लीगमध्ये (Legends League Cricket 2024) आपली जादू पसरवण्यासाठी सज्ज झाले आहेत. या क्रिकेट लीगमध्ये दिग्गज खेळाडू ख्रिस गेल, हरभजन सिंग, सुरेश रैना, शिखर धवन, मोहम्मद कैफ, रॉबिन उथप्पा आणि दिनेश कार्तिकसारखे स्टार क्रिकेटर खेळताना दिसणार आहेत. लीगचा पहिला सामना मणिपाल टायगर्स आणि कोणार्क सूर्या यांच्यात (KS vs MT) होणार आहे. कोणार्क सूर्या इरफान पठाण, तर मणिपाल टायगर्सचे कर्णधार हरभजन सिंग आहे. हा सामना आज जोधपूरमध्ये संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाईल.

लीगमध्ये एकूण 6 संघ सहभागी 

16 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या लीगमध्ये एकूण 6 संघ सहभागी होत आहेत. ज्यामध्ये इंडिया कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, कोणार्क सूर्या, मणिपाल टायगर्स, सदर्न सुपरस्टार्स आणि अर्बनरायझर्स हैदराबाद या संघांचा समावेश आहे. (हे देखील वाचा: Legends League Cricket 2024 Preview: 'क्रिकेट लिजेंड्स लीग'ला आजपासून होणार सुरुवात, येथे जाणून घ्या वेळापत्रक, लाइव्ह स्ट्रीमिंगसह संपूर्ण तपशील)

कधी अन् कुठे पाहणार सामना?

लिजेंड्स क्रिकेट लीगचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रक्षेपण होणार आहे. याशिवाय हा सामना फॅन कोडवर दाखवता येईल. त्याच वेळी, डिस्ने + हॉटस्टारवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण देखील केले जाईल.

दोन्ही संघाचे खेळाडू

मणिपाल टायगर्स 

हरभजन सिंग (कर्णधार), रॉबिन उथप्पा, थिसारा परेरा, शेल्डन कॉट्रेल, डॅन ख्रिश्चन, अँजेलो परेरा, मनोज तिवारी, असाला गुणरत्ने, सोलोमन मिरे, अनुरीत सिंग, अबू नेचिम, अमित वर्मा, इम्रान खान, राहुल शुक्ला, अमितोज सिंग , प्रवीण गुप्ता आणि सौरभ तिवारी.

कोणार्क सूर्य 

इरफान पठाण (कर्णधार), युसूफ पठाण, अंबाती रायुडू, केविन ओब्रायन, रॉस टेलर, विनय कुमार, रिचर्ड लेवी, दिलशान मुनावीरा, शाहबाज नदीम, फिडेल एडवर्ड्स, बेन लॉफलिन, राजेश बिश्नोई, प्रवीण तांबे, दिवेश, विनय कुमार. केपी अपन्ना, नवीन स्टीवर्ट.