Liam Livingstone (Photo Credit - X)

ICC T20I Rankings: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर आता आयसीसीने नवीन टी-20 क्रमवारी (ICC T20I Rankings) जाहीर केली आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता, तर इंग्लंडचा संघ दुसरा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला होता. तिसरा सामना पावसामुळे होऊ शकला नाही आणि मालिका अनिर्णित राहिली. या मालिकेत चमकदार कामगिरी करणारा इंग्लंडचा स्टार खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनने (Liam Livingstone) अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने अव्वल स्थान गाठल्यामुळे अनेक खेळाडूंचे नुकसान झाले आहे.

'या' खेळाडूंना झाले नुकसान

लिव्हिंगस्टन पहिल्या क्रमांकावर पोहोचल्याने मार्कस स्टॉइनिस, झिम्बाब्वेचा सिकंदर रझा, बांगलादेशचा शाकिब अल हसन, श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा आणि अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी यांना प्रत्येकी एक स्थान घसरावे लागले आहे. इतकेच नाही तर भारताचा हार्दिक पंड्या आणि नेपाळचा दीपेंद्र ऐरी यांचीही एका स्थानावर घसरण झाली आहे. मात्र, तरीही या सर्वांनी टॉप 10 मध्ये आपले स्थान कायम राखले आहे. दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्कराम आणि पाकिस्तानचा इमाद वसीम नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत.

हे देखील वाचा: England vs Australia ODI Series 2024 Live Streaming: टी-20 नंतर आता वनडेमध्ये भिडणार इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया, येथे जाणून घ्या कधी अन् कुठे पाहणार सामना

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 लिव्हिंगस्टोन अप्रतिम कामगिरी

लियाम लिव्हिंगस्टोनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत अप्रतिम कामगिरी केली होती. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर इंग्लंडच्या संघाला दुसऱ्या सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनने आपल्या संघाला विजयाकडे नेले. मालिकेतील दोन सामन्यांमध्ये फलंदाजी करताना त्याने 124 धावा केल्या. विकेट्सबद्दल बोलायचे झाले तर त्याने एकूण 5 विकेट घेतल्या. यामुळेच तो आता आयसीसी टी-20 क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू बनला आहे.