विराट कोहली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credit: Facebook)

टीम इंडियाचा दिग्गज फलंदाज आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) अभिभाषणाचे कौतुक केले आहे आणि देशाला कोरोना व्हायरसविरूद्ध (Coronavirus) लढण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी जगभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केले. त्यांनी 22 मार्च रोजी रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत सार्वजनिक कर्फ्यू (Curfew) लावण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की या चौदा तासांत कोणत्याही व्यक्तीने घराबाहेर पडू नये. रस्त्यावर उतरू नका किंवा सोसायटी आणि लोकलमध्ये एकत्र येऊ नका. लोकांना त्यांच्या घरी राहण्याचे पंतप्रधान मोदी यांनी आव्हान केले. पंतप्रधानांच्या या 'जनता कर्फ्यू'च्या आवाहनालाही या क्रीडा जगतने पाठिंबा दर्शविला आहे. कोहलीने दोन ट्विट केले आणि त्यांनी लिहिले की, 'सावध रहा, लक्ष द्या आणि जागरूकता असताना कोविड-19 च्या धोक्याचा सामना करा. एक जबाबदार नागरिक म्हणून आपण सुरक्षेसाठी निश्चित केलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे आणि त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जाहीर केले आहे." (Coronavirus: येत्या 22 मार्च रोजी COVID-19 विरोधात 'जनता कर्फ्यू' पाळावा- पंतप्रधान नरेंद्र मोदी)

विराटने आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिले की, 'या बरोबरच मी कोरोना विषाणूच्या लढाईत आपले प्रयत्न करणारे देश आणि परदेशातील वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्वांचेही उल्लेख करू इच्छित आहे. आपण त्यांचे समर्थन केले पाहिजे आणि स्वतःची आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घेतली पाहिजे आणि स्वच्छ वातावरण तयार केले पाहिजे." कोहली व्यतिरिक्त केएल राहुलसह इतर अनेकांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे आणि देशाला कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी प्रोत्साहित केले आहे आणि आवाहन केले.

टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी लिहिले, "या आपल्या पंतप्रधानांशी हातमिळवणी करूया आणि 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत सार्वजनिक कर्फ्यूचे पालन करूया. एक राष्ट्र म्हणून आपण खूप संयम ठेवण्याची गरज आहे."

टीम इंडियाचा फलंदाज शिखर धवनने लिहिले की, “पंतप्रधानांचे शब्द पाळत प्रत्येकाने फक्त 22 तारखेलाच आपल्या घरीच रहावे”.

ऑलिम्पिक पदकविजेता आणि कुस्तीपटू योगेश्वर दत्त यांनी लिहिले की, "मी शपथ घेत आहे की, 22 मार्च रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत मी सार्वजनिक कर्फ्यू पाळू. कोरोनासारख्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्याच्या प्रयत्नात पंतप्रधान मोदींचा साथ देईन. कारण आपल्या सर्वांना एकत्रितपणे हे युद्ध जिंकले पाहिजे."

रविचंद्रन अश्विन म्हणाला,"विश्वास ठेवा किंवा मानू नका, कोट्यावधी लोकांसारख्या असणाऱ्या आपल्यासारख्या देशाला संध्याकाळी नरेंद्र मोदी यांनी जे सांगितले ते ऐकायला हवे."

हरभजन सिंहनेही पंतप्रधान मोदींच्या सुचाना मान्य केल्या. आणि मोदींनी दिलेल्या संदेश पोहचवण्याची शपथ घेतली.

सायना नेहवालने लिहिले, "मी वचन देते की मी आज रविवारी सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत जनतेच्या कर्फ्यूचे काटेकोरपणे अनुसरण करेन जेणेकरुन आम्ही कोरोना व्हायरसविरूद्ध भारताचा लढा मजबूत करू. हे आपल्याला एकत्र आणेल आणि आपण या कठीण काळात एक राष्ट्र म्हणून मजबूत उभे राहू!"