(Photo Credit: Instagram/sachintendulkar)

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने भारतात वेगाने वाढणाऱ्या कोरोना व्हायरसविरुद्ध लढाईत आपले योगदान दिले. सचिननें कोविड-19 विरुद्ध लढाईत राज्य आणि केंद्र सरकारला 25-25 लक्षांची मदत जाहीर केली. या आजारामुळे आतापर्यंत भारतात 18 लोकांचे प्राण गमावले आहेत. या रोगाविरुद्ध लढण्यासाठी भारतीय खेळाडूने दिलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे. सूत्रांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, 'सचिन तेंडुलकर यांनी पंतप्रधान मदत निधी आणि मुख्यमंत्री मदत निधीला प्रत्येकी 25 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड-19 शी लढण्यासाठी मदत म्हणून ही रक्कम दिली जाते. दोन्ही फंडयामध्ये सहकार्य करण्याचा त्याचा निर्णय होता." संपूर्ण भारतात सध्या 21 दिवसांचे लॉकडाऊन सुरु आहे. 14 एप्रिलपर्यंत संपूर्ण भारतात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या जागतिक साथीच्या आजारामुळे 20,000 हून अधिक लोकांनी प्राण गमावले आहेत. (Coronavirus: 800 कोटींची वार्षिक कमाई असलेल्या एमएस धोनी ने कोरोनाग्रस्तांना 1 लाखांची आर्थिक मदत केल्याने नेटिझन्समध्ये संताप)

सचिन व्यतिरिक्त अनेक खेळाडूंनी त्यांचे वेतन दान म्हणून दिले आहे, तर काहींनी या धोकादायक व्हायरसविरूद्ध लढण्यासाठी वैद्यकीय उपकरणं दान केली आहेत. कुस्तीपटू बजरंग पुनिया, धावपटू हिमा दास, एमएस धोनी आणि पीव्ही सिंधू यांनीही या व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. पठाण बंधू-युसुफ आणि इरफानने बडोदा पोलिस आणि आरोग्य विभागाला 4000 फेस मास्क दिले आहेत. याशिवाय, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने (एससीए) कोविड-19 च्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी 42 लाख रुपयांची देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे. एससीए कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी स्थापन झालेल्या पंतप्रधान रिलीफ फंड व गुजरातचे मुख्यमंत्री रिलीफ फंडाला प्रत्येकी 21 लाख रुपये देणार आहेत. यापूर्वी, बंगाल क्रिकेट असोसिएशनने (सीएबी) देखील पश्चिम बंगाल सरकारच्या आपत्कालीन मदत निधीसाठी 25 लाख रुपयांची देणगी जाहीर केली होती.

महाराष्ट्रमध्ये सध्या कोरोनाचे 130 रुग्णांची नोंद झाली आहे. 46 वर्षांचा सचिन धर्मादाय कार्याशी संबंधित आहे. त्याने बर्‍याचदा पुढाकार घेत लोकांना मदत केली, जे कधीच सार्वजनिक केले गेले नाही.