Coronavirus: 800 कोटींची वार्षिक कमाई असलेल्या एमएस धोनी ने कोरोनाग्रस्तांना 1 लाखांची आर्थिक मदत केल्याने नेटिझन्समध्ये संताप
एमएस धोनी (Photo Credits: Getty Images)

जंगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) जवळजवळ संपूर्ण जगाला घरी राहण्यास भाग पाडले आहे. या घातक विषाणूचा प्रसार खंडित करण्यासाठी भारतातही 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. तथापि, या लॉकडाऊनमुळे रोजंदारी कामगारांच्या कुटुंबियांसाठी समस्या निर्माण झाली आहे. यासाठी अनेक फाऊंडेशन आणि चॅरिटेबल ट्रस्ट त्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. यात क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटींनीही त्यांचा हातभार लगावला आहे. दिग्गज यष्टीरक्षक महेंद्र सिंह धोनीही (Mahendra Singh Dhoni) पीडितांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. पुण्यातील दैनंदिन मजुरीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबासाठी धोनीने एक लाख रुपयांची देणगी दिली आहे. धोनीच्या आर्थिक मदतीबद्दल त्याचे चाहते सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. धोनीने पुण्यातील सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट मुकुल माधव फाउंडेशनला जमाव निधी वेबसाइट केट्टोमार्फत ही रक्कम दान केली आहे. (Coronavirus Outbreak: एमएस धोनी याची पुण्यात रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांना लाख रुपयांची मदत)

चाहत्यांनी म्हटले आहे की, वार्षिक 800 कोटी रुपये मिळविणार्‍या धोनीने केवळ एक लाख रुपयांची मदत करणे खेदजनक आहे. दुसरीकडे, सचिन तेंडुलकर याने महाराष्ट्र सरकार आणि पंतप्रधान मदत निधीला 25-25 लाख रूपयांची देणगी जाहीर केली. विशेष म्हणजे, धोनी आतापर्यंत निधी गोळा करणार्‍यात अव्वल देणगीदार आहे. तथापि, चाहते धोनीवर नाखूष असल्याचे दिसले आणि त्यांनी गरजू लोकांसाठी मोठी रक्कम दान न केल्याबद्दल टीका केली. पाहा काय म्हणाले यूजर्स:

दुःखद

12 वीच्या विद्यार्थ्याने 2.5 लाखांची देणगी दिली

त्याची एकूण संपत्ती अंदाजे 800 कोटी रुपये आहे

जितके जास्त पैसे तितके कंजूस

सर्वात श्रीमंत व्यक्तीने 1 लाख दान केले

दरम्यान, धोनी व्यतिरिक्त सौरव गांगुली, इरफान पठाण, युसुफ पठाण हेही गरिबांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. बीसीसीआयच्या अध्यक्षांनी 50 लाख रुपयांचे तांदूळ देण्याचे वचन दिले आहे, तर इरफान आणि युसूफने कोरोना व्हायरसपासून बचावासाठी लोकांना फेस मास्क दान केले आहेत.पीव्ही सिंधू, हिमा दास यांनीही आपल्या परीने देणगी जाहीर केली आहे.