Ajantha Mendis ( फाईल फोटो)

श्रीलंकेचा ( Srilanka) यशस्वी फिरकी गोलंदाज अजंता मेंडीसने (Ajanta mendis) अंतराष्ट्रीय क्रिकेटमधून ( International Cricket) निवृत्ती जाहीर केली आहे. अजंता मेंडीसच्या गोलंदाजीसमोर अनेक फलंदाजांनी गुडघे टेकले आहेत. मिस्ट्री स्पिनर म्हणून ओळखला जाणारा अजंता मेंडीस याने क्रिकटमधून निवृत्ती स्वीकारुन सर्वांनाच धक्का दिला आहे. अंजता याच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याचे कौतूक केले आहे. तसेच पुढच्या वाटचालीसाठी त्याला भरभरुन शुभेच्छाही दिल्या आहेत.

अजंता मेंडीस याने 2008 साली क्रिकटमध्ये पदार्पण केले होते. पहिल्याच सामन्यात त्याने चांगली कामगिरी करत वेस्टइंडीजच्या (West Indies) संघासमोर मोठी अडचण निर्माण केली होती. मेंडीस  हा त्याच्या कॅरम बॉलसाठी ओळखला जात आहे. अजंता मेंडीसने श्रीलंकेकडून 19 कसोटीत 70 विकेट्स, 87 वनडेत 152 विकेट्स आणि 39 टी20 सामन्यात 66 असे एकूण 288 विकेट्स घेतले आहेत. तसेच त्याने त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना न्यूझीलंड (Newzealand) विरुद्ध ख्राईस्टचर्च येथे खेळला.हे देखील वाचा-The Wall राहुल द्रविड यांच्या जागी भारत 'अ' संघ आणि अंडर -19 क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी 'या' माजी खेळाडूंची निवड

शुभेच्छांचे ट्वीट-

 

एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद 50 विकेट पटकवण्याचा विक्रमही मेंडीस याच्या नावावर आहे. त्याने केवळ 19 सामन्यातच 50 विकेटचा टप्पा गाठला होता. त्याच्या बोटाची जादूने त्याने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये दोन वेळा 6 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतले आहेत. आशिया कपच्या अंतिम सामन्यात त्याने भारताविरुद्ध (Team India) १३ धावा देऊन ६ विकेट मिळवले होते. त्यामुळे श्रीलंकेच्या संघाने १०० धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात मेंडीस याने जगाला त्याची ओळख दाखवली होती . त्याला त्याचवर्षी भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली.