बबिता फोगाट (Photo Credit: Instagram)

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनेत वाढ होत चालली आहे. हंदवाडा (Handwara) येथे पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे आणि या हल्ल्यात सीपीएफच्या (CRPF) तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी शनिवारी रात्री झालेल्या चकमकीत सैन्य दलातील कर्नल आणि मेजरसह पाच सुरक्षा कर्मचारी शहीद झाले होते. हा हल्ला हंदवाराच्या काजियाबाद भागात झाला. काश्मीरमधील हंदवाडा येथे सुरक्षा बल आणि दहशतवाद्यांमध्ये चाललेल्या चकमकीत भारतीय सैन्याच्या या जिवांना मरण आले. या शहिदांना कुस्तीगीर बबिता फोगाटने (Babita Phogat) श्रद्धांजली वाहिली आणि कडक शब्दात दहशतवाद्यांना चेतावणी दिली. जम्मू-काश्मीरमधील हंदवाडा येथे काही दहशतवादी लपून बसले असल्याचे सैन्याला समजले. शोध मोहीम राबवण्यासाठी सैन्य आणि काश्मीर पोलिसांनी एकत्रित मोहीम राबविली, त्या दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. ज्यामध्ये 2 मोठे दहशतवादी ठार झाले, पण लष्कराचे 4 सैनिक आणि जम्मू काश्मीर पोलिस अधिकाऱ्यानेही आपला जीव गमावला. ('त्याग विसरणार नाही...' हंदवाडा येथे लष्करच्या अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहिद झालेल्यांना विराट कोहली, गौतम गंभीर यांनी वाहिली श्रद्धांजली)

बबिताने लिहिले, "हंदवाड्यात देशाच्या रक्षणासाठी हसत-हसत आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांना वंदन. अशा शूर, संन्यासी, त्याग करणाऱ्या बलिदानाचा भारताला अभिमान आहे." यापूर्वी बबिताने ट्विट केले आणि म्हण्टले, "उत्तर नक्की मिळेल." यापूर्वी, भारतीय क्रिकेट टीमच्या पूर्व आणि सध्याच्या सदस्यांनी या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण केली. कर्णधार विराट कोहलीपासून ते दिग्गज युवराज सिंह आणि माजी क्रिकेटपटू व भाजप खासदार गौतम गंभीर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली.

बबिता फोगाटचे ट्विट:

उत्तर नक्की मिळेल

शनिवारी रात्री अतिरेक्यांसह 20 तास चाललेल्या चकमकीत कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद, लान्स नाईक दिनेश सिंह, नायक राजेश कुमार आणि उपनिरीक्षक काझी शकील अहमद शाहिद झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आणि सांगितले की त्यांचा शौर्य आणि त्याग कधीही विसरला जाणार नाहीत.