Gautam Gambhir

गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) आमनेसामने यायचे तेव्हा वातावरण नेहमीच तापलेले असायचे. दोघेही मैदानावर अनेकदा भिडले आहेत, पण भारतीय फलंदाजाच्या चेंडूवर आफ्रिदीचे हृदय गंभीरसाठी वितळले. लीजंड लीग क्रिकेट (Legends League Cricket) मास्टर्सचा सलामीचा सामना शाहिद आफ्रिदीच्या आशिया लायन्स (Asia Lions) आणि गंभीरच्या इंडिया महाराजा यांच्यात खेळला गेला. प्रथम फलंदाजी करताना आशिया संघाने 6 गड्यांच्या मोबदल्यात 165 धावा केल्या. भारत लक्ष्याचा पाठलाग करत होता. 12व्या षटकात अब्दुल रझाकचा चेंडू गंभीरच्या हेल्मेटला लागला तेव्हा गंभीर 43 धावा करून मैदानावर होता.

चेंडू त्याच्या हेल्मेटसमोरच्या फ्रेमवर आदळला. त्यानंतर आफ्रिदी सर्व काही सोडून त्याच्याकडे गेला आणि त्याने गंभीरला त्याची तब्येत विचारली. तो ठीक असल्याचे गंभीर म्हणाला. चेंडू लागल्यानंतर भारतीय फलंदाजाने 13व्या षटकात आफ्रिदीच्या चेंडूवर चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. 14व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गंभीरने रझाकच्या चेंडूवर 54 धावांवर आपली विकेट गमावली.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर आशियाने दिलेल्या 166 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना भारताला 20 षटकात केवळ 156 धावा करता आल्या आणि 9 धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताकडून गौतम गंभीरने सर्वाधिक 54 धावा केल्या. त्याने 39 चेंडूत 54 धावा ठोकल्या होत्या. तर आशियाकडून मिसबाह-उल-हकने सर्वाधिक 73 धावा केल्या. हेही वाचा Mahendra Singh Dhoni चा जबरा फॅन, चक्क लग्नपत्रिकेवर छापला माहीचा फोटो

मिसबाह हा सामनावीर ठरला. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 4 षटकार मारले. तर शाहिद आफ्रिदीला केवळ 12 धावा करता आल्या. गोलंदाजीतही तो फ्लॉप ठरला. त्याने 4 षटकात 35 धावा लुटल्या आणि त्याला एकही यश मिळू शकले नाही.