Mahendra Singh Dhoni चा जबरा फॅन, चक्क लग्नपत्रिकेवर छापला माहीचा फोटो
Mahendra Singh Dhoni (PC - Twitter)

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची (Mahendra Singh Dhoni) फॅन फॉलोइंग जगभरात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. जागतिक क्रिकेटमध्ये तीन वेगवेगळ्या आयसीसी ट्रॉफी (ICC Trophy) जिंकणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. धोनीने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला तरी आजही त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. दरम्यान, त्याच्या एका चाहत्याने अशी क्रेझ दाखवली आहे जी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. कर्नाटकात राहणाऱ्या एका व्यक्तीने धोनीचा फोटोही आपल्या लग्नाच्या कार्डवर छापला आहे.

कार्डच्या उजव्या बाजूला धोनीचा फोटो छापण्यात आला होता, तिथे वधू-वरांची नावेही छापण्यात आली होती. या कार्डवर छापलेला धोनीचा फोटो 2013 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा आहे. महेंद्रसिंग धोनी सध्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 हंगामाच्या तयारीसाठी चेन्नईमध्ये संघासोबत घाम गाळत आहे. आगामी आयपीएल सीझनबद्दल असे बोलले जात आहे की धोनीच्या कारकिर्दीतील हा शेवटचा सीझन असू शकतो आणि त्यानंतर तो या टी-20 लीगला अलविदा म्हणू शकतो.

महेंद्रसिंग धोनीच्या जागी चेन्नई सुपर किंग्ज कोणत्या खेळाडूकडे कर्णधारपद सोपवणार याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही, गेल्या मोसमात रवींद्र जडेजाकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली असली तरी संघाची खराब कामगिरी लक्षात घेऊन धोनीने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली होती. हेही वाचा Shakib Al Hasan Beating Fan Video: बांगलादेशी क्रिकेटर शकीब अल हसनचा सुटला संयम, चाहत्याला सर्वांसमोर केली मारहाण (Watch Video)

चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला आगामी आयपीएल हंगामातील पहिला सामना गतविजेत्या गुजरात टायटन्सविरुद्ध 31 मार्च रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळायचा आहे. त्याचवेळी, या मोसमात जुन्या फॉर्मेटनुसार सामने खेळले जात असल्याने, CSK ला चेपॉकमध्ये बराच कालावधीनंतर सामना खेळण्याची संधी मिळणार आहे, ज्यामध्ये संघ 3 एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळेल.