Woman Attacked In Lahore Hotel: पाकिस्तानच्या लाहोरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाहोरमधील इचरा मार्केटमध्ये एका स्थानिक हॉटेलमध्ये जेवण करण्यास आलेल्या महिलेवर जमावाने हल्ला केला आहे. महिलेवर ईशनिंदा केल्याचा आरोप करत दुष्ट जमावाचे तिला लक्ष्य बनवले. महिलेच्या कपड्यांवर कुराणातील वचने कोरलेली पाहिल्याचा दावा जमावाने केला. त्यानंतरच एकच गोंधळ उडाला. त्यानंतर अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. जेव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा संतप्त जमावाने वाढलेल्या तणावादरम्यान महिलेला पकडले होते. जमावाने महिलेला घेरले आणि आरोप आहे की त्यांनी तिला धमक्या दिल्या. त्यानंतर परिस्थिती अधिकच अस्थिर होत गेली. या गोंधळात सहाय्यक पोलीस अधीक्षक (एएसपी) शेहरबानो आणि त्यांच्या पथकाने हस्तक्षेप केल्याने महिलेची सुटका झाली. तपासणी केल्यावर, एएसपी शेहरबानो आणि त्यांच्या टीमला महिलेच्या पोशाखावर कुराणाचे वचन किंवा आक्षेपार्ह मजकूर आढळला नाही. सध्या या घटनेचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा: Pakistan Child Marriage: पाकिस्तानात बालविवाहावरून खळबळ! 13 वर्षाच्या मुलाचा 12 वर्षाच्या मुलीची विवाह, व्हिडिओ व्हायरल)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)