US Cyberattack: अमेरिकेमधून एक मोठ्या सायबर हल्ल्याची घटना समोर येत आहे. युनायटेड स्टेट्समधील सर्वात मोठ्या हेल्थकेअर आयटी व्यवसायांपैकी एकावर सायबर हल्ला झाला आहे, त्यामुळे देशभरातील फार्मसी प्रिस्क्रिप्शन ऑर्डरला विलंब होत असल्याची तक्रार करत आहेत. बुधवारी सकाळी चेंज हेल्थकेअरच्या नेटवर्कवर परिणाम करणारा हा सायबर हल्ला झाला. चेंज हेल्थकेअर ही संस्था संपूर्ण युनायटेड स्टेट्समधील रूग्णांकडून ऑर्डर आणि पैशांचे व्यवहार करते. याबाबत चेंज हेल्थकेअरने एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे, 'चेंज हेल्थकेअरला सायबर सुरक्षा समस्येशी संबंधित नेटवर्क व्यत्यय येत आहे आणि आमचे तज्ञ या समस्येचे निराकरण करण्यासाठी काम करत आहेत. आम्हाला या बाहेरील धोक्याची जाणीव झाल्यानंतर, आमचे भागीदार आणि रूग्णांचे संरक्षण करण्याच्या हितासाठी, आम्ही पुढील परिणाम टाळण्यासाठी आमच्या सिस्टम डिस्कनेक्ट करण्यासाठी त्वरित कारवाई केली.' चेंज हेल्थकेअरच्या या सायबर सुरक्षा समस्येचे स्वरूप किंवा मूळ याविषयी सध्या कोणताही माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही. (हेही वाचा: Farmers Protest: शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर X अकांऊट बंद, ग्लोबल गव्हर्नमेंट अफेयर्सने केले ट्विट)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)