खलिस्तानी दहशतवादी (Khalistan Liberation Force) लखबीर सिंग रोडेचा (Lakhbir Singh Rode) पाकिस्तानमध्ये मृत्यू झाला आहे. लखबीर सिंग रोडे हा 72 वर्षांचे होता. रोडे याचे 2 डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले पण पाकिस्तानने त्यांच्या मृत्यूची बातमी लपवून ठेवली. ही बातमी लीक होऊ नये म्हणून पाकिस्तानात शीख रीतिरिवाजानुसार गुप्तपणे त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. लखबीर सिंग रोडे हा पाकिस्तानची (Pakistan) गुप्तचर संस्था आयएसआयच्या (ISI) सांगण्यावरून पंजाबमध्ये भारताविरुद्धच्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता.
पाहा पोस्ट -
#BREAKING | Lakhbir Singh Rode, Pak-based chief of banned Khalistan Liberation Force, is dead
Detail here: https://t.co/g7uOHMcOYY pic.twitter.com/QYMkxa8dAh
— Hindustan Times (@htTweets) December 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)