Bonza Airline Abruptly Cancels All Flights: जरा कल्पना करा की, तुम्ही फ्लाइट तिकीट बुक केल्यानंतर विमानतळावर पोहोचलात आणि तिथे पोहोचल्यावर तुम्हाला कळले की तुम्ही ज्या एअरलाइनसाठी फ्लाइट घेणार होता ती बंद झाली आहे. अशावेळी तुमचे काय होईल? असाच काहीसा प्रकार ऑस्ट्रेलियात घडला आहे. ऑस्ट्रेलियाची बजेट एअरलाइन बोन्झा एअरलाइनने मंगळवारी सर्व उड्डाणे एकाच वेळी थांबवली. विमान कंपनीच्या या निर्णयामुळे देशातील विविध विमानतळांवर हजारो प्रवासी अडकून पडले होते. सध्या या प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यात सरकार व्यस्त आहे. बोन्झा एअरलाईन 15 महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती. ही ऑस्ट्रेलियातील सर्वात नवीन विमान कंपनी होती. कमी भाड्यासाठी ती प्रसिद्ध होती. बोन्झा एअरलाइनला अमेरिकन गुंतवणूक फर्म 777 पार्टनर्सचा पाठिंबा होता.

आता आपली सेवा थांबवल्यावर या बजेट एअरलाइनने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, आम्ही ग्राहकांसमोर खेद व्यक्त करतो. मात्र आता व्यवसाय पुढे चालवणे शक्य नाही. त्यामुळे मंगळवारपासून बोंजा एअरलाइनच्या सर्व सेवा बंद आहेत. एअरलाइनने फ्लाइट बुक केलेल्या प्रवाशांना विमानतळावर न जाण्याचा सल्ला दिला आहे. (हेही वाचा: Google Layoffs: गुगलमध्ये टाळेबंदी सुरूच, कंपनीने काढली पायथनची संपूर्ण टीम, जाणून घ्या, कारण)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)