कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतो. बुधवारीही कपिल शर्माने त्याच्या सोशल मीडियावर विमान प्रवासाबाबत एक संतप्त पोस्ट केली. इंडिगो विमानाला उशीर झाल्यामुळे कपिल शर्माने एक पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. कपिल म्हणतो, ‘प्रिय इंडिगो आधी तुम्ही आम्हाला 50 मिनिटे बसमध्ये थांबायला लावले आणि आता तुमची टीम म्हणतेय पायलट ट्रॅफिकमध्ये अडकला आहे, काय? खरंच? आम्ही 8 वाजता टेक ऑफ करणार होतो आणि आता 9:20 वाजले आहेत, तरीही कॉकपिटमध्ये पायलट नाही. तुम्हाला वाटते का की हे 180 प्रवासी पुन्हा इंडिगोमध्ये उड्डाण करतील? कधीच नाही.’

काही वेळानंतर कपिलने आणखी एक पोस्ट केली ज्यामध्ये तो म्हणतो, ‘आता ते सर्व प्रवाशांना डी-बोर्डिंग करत आहेत आणि म्हणत आहेत की ते आम्हाला दुसर्‍या विमानात पाठवतील, मात्र त्यासाठी सुरक्षा तपासणीसाठी आम्हाला पुन्हा टर्मिनलवर जावे लागेल.’ यासोबत कपिलने विमानातून लोक खाली उतरत असल्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यानंतर केलेल्या आणखी एका पोस्टमध्ये कपिल म्हणतो, ‘इंडिगो तुमच्यामुळे लोकांना त्रास होत आहे. तुम्ही फक्त खोटे बोलत आहात. यात्मध्ये काही व्हील चेअरवर वृद्ध प्रवासी आहेत, त्यांची तब्येत फारशी चांगली नाही. तुमचा धिक्कार असो.’ (हेही वाचा: Randeep Hooda Marriage Video: अभिनेता रणदीप हुड्डाने बांधली गर्लफ्रेंड Lin Laishram शी लग्नगाठ; मणिपुरी रितीरिवाजानुसार पार पडला विवाहसोहळा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)