विमान प्रवासात घडणार्‍या अनेक घटनांचे व्हिडिओ वायरल झाले आहेत. सध्या वायरल होत असलेल्या एका व्हिडिओ मध्ये चक्क पॅसेंजर आपल्या सोबत प्रवास करणार्‍या इतरांना चहाअ वाटत असल्याचा व्हिडिओ तुफान वायरल होत आहे. ही घटना इंडिगो फ्लाईट मधील आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात अनेकदा वापरले जाणारे डिस्पोजेबल कप मधून चहा वाटत असल्याचं या व्हिडिओ मधून दिसत आहे. या वायरल व्हिडीओ वर नेटकर्‍यांमधून मिश्र प्रतिक्रिया समोर येत आहे. काहींनी या व्यक्तीने फ्लाईट मध्ये चहा कसा आणला यावर प्रश्न उपस्थित केला आहे तर काहींनी इंडिओ मधील ही बससेवा असल्याचं म्हटलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)