भारतीय वंशाचे अजय बंगा हे जागतिक बँकेचे पुढील अध्यक्ष होणार आहेत. बुधवारी अजय बंगा यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची पुष्टी जागतिक बँकेने केली आहे. बँकेने बंगा यांच्या नेतृत्वाला पाच वर्षांच्या कालावधीसाठी मान्यता देण्याच्या मतानंतर लगेचच प्रकाशित केलेल्या निवेदनात म्हटले की, ‘जागतिक बँक समूह बंगासोबत काम करण्यास उत्सुक आहे. ते ही भूमिका स्वीकारतील.’ जागतिक बँकेचे विद्यमान अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी जवळपास वर्षभरापूर्वी पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला होता. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी अजय बंगा यांच्या उमेदवारीला भारताने पाठिंबा दिला. पुण्यात जन्मलेल्या बंगा यांनी 70 च्या दशकात शिमल्यातील सेंट एडवर्ड स्कूलमधून प्राथमिक शिक्षण घेतले. त्यांचे वडील सैन्यात अधिकारी होते. (हेही वाचा: जगभरातील अनेक देशांमध्ये आर्थिक मंदीची शक्यता; भारताला मिळणार दिलासा, जाणून घ्या कोणत्या देशांना बसणार सर्वाधिक फटका)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)