पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात भीषण दुर्गटना घडली आहे. बलुचिस्तान येथील लासबेला परिसरात एक प्रवासी बस दरीत कोसळून किमान ३९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी पाकिस्तानच्या न्यूज चॅनलद्वारे प्रसारित करण्यात आली आहे.  क्वेटाहून कराचीला जाणाऱ्या या बसमध्ये एकूण ४८ प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती मिळत आहे. तरी यांतील तब्बल ३९ जणांचा जागीच मृत्यू होण ही मोठी दुर्दैवी बाब आहे. दरम्यान बसचा वेग अधिक असल्याने यू टर्न घेतना बस पुलाच्या पिलरवर आदळून दरीत कोसळली आणि उंचावरुन बस कोसळल्याने बसला आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)