नासाने गुरुवारी जगभरातील लोकांमध्ये उत्सुकता असलेल्या UFO (Unidentified Flying Objects) च्या वर्षभराच्या अभ्यासाविषयीचा बहुप्रतिक्षित अहवाल प्रसिद्ध केला. साधारण 33 पानांचा अहवाल प्रसिद्ध करताना नासाने सांगितले की, UFOs च्या अभ्यासासाठी नवीन वैज्ञानिक तंत्रे आवश्यक आहेत. विशेष म्हणजे, मेक्सिकन काँग्रेसमध्ये 1,000 वर्षे जुने समजले जाणाऱ्या एलियनचे कथित ममीफाइड मृतदेह प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांनी हा अहवाल आला आहे. अहवाल जारी करताना, नासाचे प्रशासक बिल नेल्सन म्हणाले की, त्यांचा विश्वास आहे की विश्वात इतर जीव (एलियन) आहेत.

नासाने सांगितले की, यूएफओची उच्च दर्जाची निरीक्षणे इतकी कमी आहेत की त्यांच्याबद्दल कोणतेही वैज्ञानिक निष्कर्ष काढता येत नाहीत. नासाने असेही म्हटले आहे की ते UAPs मध्ये संशोधनासाठी एक नवीन संचालक नेमतील, कारण एका तज्ञ पॅनेलने स्पेस एजन्सीला एलियनवरील माहिती गोळा करण्याचे प्रयत्न वाढवण्याचे आवाहन केले आहे. तुम्ही 'या' ठिकाणी संपूर्ण रिपोर्ट पाहू शकता. (हेही वाचा: Japan ठरणार चंद्रावर पोहचणारा पाचवा देश? Lunar Lander SLIM सह ‘Moon Sniper'अवकाशामध्ये झेपावलं)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)