मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल 2022 च्या 31 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने लखनौ सुपर जायंट्सचा 18 धावांनी पराभव केला.  आरसीबीचा हा पाचवा विजय आहे. त्याचबरोबर लखनौचा हा तिसरा पराभव आहे.  फाफ डू प्लेसिसच्या 96 धावांच्या खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकांत 6 बाद 181 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौचा संघ निर्धारित षटकांत केवळ 163 धावाच करू शकला. आरसीबीच्या या विजयाचा हिरो होता वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड.  त्याने चार षटकांत केवळ 25 धावा देत चार विकेट घेतल्या. हेझलवूडने क्विंटन डी कॉक, मनीष पांडे, कृणाल पांड्या आणि आयुष बडोनी यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)