Dhoni 3 Sixes: आयपीएलची उत्सुकता सर्वांनाच भारावून टाकत असते. बॉलीवूड स्टार्सही यापासून दूर नाहीत. चेन्नई सुपर किंग्स(Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात सामना रंगला होता, जो पाहण्यासाठी अनेक बॉलिवूड स्टार्स (Bollywood Stars)आले होते. करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan), नेहा धुपिया (Neha Dhupia), अगंद बेदी स्टेडियममध्ये स्पॉट झाले. या सामन्यात महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni)ने चेन्नई सुपर किंग्जच्यावतीने 3 षटकार ठोकले होते. ज्यावर करीना आणि नेहाची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाल्यी आहे. एकीकडे 3 षटकार पाहून नेहा धुपिया अवाक झाली आहे. तर, करिनाने तर डोळेच मोठे केले आहेत. त्यांच्या प्रतिक्रियाही पाहण्यासारख्या आहेत. त्यांच्या पुढे बसलेल्या एका प्रेक्षकाने त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड केल्याची शक्यता आहे.(हेही वाचा :Chennai Beat Mumbai: चेन्नईने मुंबईचा 20 धावांनी पराभव केला, रोहितचे नाबाद शतक व्यर्थ; मथिशा पाथिरानाने घेतल्या 4 विकेट )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)