RCB vs GT Live Score Update: विराट कोहलीच्या दमदार शतकामुळे आरसीबीने गुजरात समोर ठेवले 198 धावांचे लक्ष्य

दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे.

RCB vs GT Live Score Update: विराट कोहलीच्या दमदार शतकामुळे आरसीबीने गुजरात समोर ठेवले 198 धावांचे लक्ष्य
Virat Kohli & Faf-Du-Plessis (Photo Credit - Twitter)

आयपीएलच्या 16 व्या (IPL 2023) मोसमातील 70 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB vs GT) गुजरात टायटन्सचा सामना करत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा देखील साखळी फेरीतील शेवटचा सामना आहे. गुणतालिकेत गुजरात अव्वल स्थानावर आहे. त्याने प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. गुजरातला हरवून प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याकडे आरसीबीची नजर असेल. दरम्यान, प्रथम फलंदांजी करताना आरसीबीने गुजरातसमोर 198 धावाचे लक्ष्य ठेवले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 21, 2023 10:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).