टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज विश्वचषक 2023 चा पाचवा रोमांचक सामना रंगला आहे. यावेळी टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. नुकतीच या दोन संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. टीम इंडियाने या मालिकेत 2-1 असा विजय मिळवला होता. आता पुन्हा एकदा दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले आहेत. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचे संघ खूप मजबूत आहेत. मैदानावर एक रोमांचक स्पर्धा पाहायला मिळेल. दरम्यान, ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाला 49.3 षटकांत केवळ 199 धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 46 धावा केल्या. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला 50 षटकात 200 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियाला चौथा मोठा धक्का बसला आहे. विराट कोहली 85 धावा करून जोश हेजलवूडचा बळी ठरला. टीम इंडियाचा स्कोर 167/4 आहे.
End of a magnificent knock from Virat Kohli, who departs for 85 👏👏#TeamIndia 168/4, with 32 more runs to win.
Follow the Match ▶️ https://t.co/ToKaGif9ri#CWC23 | #INDvAUS | #MeninBlue pic.twitter.com/YL4J8DrI6Y
— BCCI (@BCCI) October 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)