Uganda क्रिकेट संघाने रचला इतिहास, T20 World Cup 2024 साठी ठरला पात्र

युगांडाने क्रिकेट टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) साठी पात्र ठरण्यात यश मिळविले आहे. यासह या स्पर्धेत सहभागी होणारा हा केवळ पाचवा आफ्रिकन देश ठरला आहे.

Uganda क्रिकेट संघाने रचला इतिहास, T20 World Cup 2024 साठी ठरला पात्र
Uganda Team (Photo Credit - ICC)

Uganda Team Qualified for the T20 World Cup 2024: युगांडा (Uganda) क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे. युगांडाने क्रिकेट टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) साठी पात्र ठरण्यात यश मिळविले आहे. यासह या स्पर्धेत सहभागी होणारा हा केवळ पाचवा आफ्रिकन देश ठरला आहे. त्याचबरोबर झिम्बाब्वे संघ 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता फेरीतून बाहेर पडला आहे. दुसरीकडे, नामिबिया आणि युगांडाकडून पराभवाचा सामना करावा लागलेला झिम्बाब्वे संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरू शकला नाही. गेल्या टी-20 विश्वचषकात झिम्बाब्वे संघाचा भाग होता. (हे देखील वाचा: Jai Shree Ram By Glenn Maxwell: तुफानी खेळानंतर ग्लेन मॅक्सवेलची पोस्ट व्हायरल, जय श्री राम म्हणत भारताला दिला निरोप)

T20 World Cup 2024 साठी आतापर्यंत पात्र ठरलेले संघ:

वेस्ट इंडिज, यूएसए, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा

पाहा ट्विट

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 30, 2023 04:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).