भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळला जात आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 8 गडी गमावून 208 धावा केल्या होत्या. आता दुसऱ्या दिवसाचा खेळ काही वेळात सुरू होतो. याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचे फलंदाज लवकरच पॅव्हेलियनमध्ये परतले त्यानंतर केएल राहुलने (KL Rahul) डावाची धुरा सांभाळली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत केएल राहुल 70 धावा करून नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून स्टार गोलंदाज कागिसो रबाडाने 5 बळी घेतले. दरम्यान, टीम इंडियाचा पहिला डाव 67.4 षटकात 245 धावांवर संपुष्टात आला. टीम इंडियासाठी केएल राहुलने सर्वाधिक 101 धावांची खेळी खेळली. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक 5 बळी घेतले. (हे देखील वाचा: Hardik Pandya Out of Afghanistan T20 Series: हार्दिक पांड्या अफगाणिस्तान टी-20 मालिकेतून बाहेर, थेट आयपीएल 2024 मध्ये दिसण्याची शक्यता)
1ST Test. WICKET! 67.4: K L Rahul 101(137) b Nandre Burger, India 245 all out https://t.co/032B8Fn3iC #SAvIND
— BCCI (@BCCI) December 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)