भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन वनडे मालिकेतील तिसरा सामना काही वेळात खेळवला जाणार आहे. इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने असतील. टीम इंडिया मालिकेत 2-0 ने पुढे आहे. तिसरा सामना जिंकून मालिकेत क्लीन स्वीप करण्याकडे त्याची नजर आहे. यापूर्वीच्या मालिकेत भारताने श्रीलंकेचा 3-0 असा पराभव केला होता. तसेच हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल. नाणेफेक दुपारी 1 वाजता होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे भारत आणि न्यूझीलंड एकदिवसीय मालिका प्रसारित करण्याचे अधिकार आहेत. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह पाहू शकता. तसेच भारतातील हॉटस्टार अॅपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.
Hello from Indore ?
Gearing up for the third and final #INDvNZ ODI ✅
Can #TeamIndia make it 3️⃣-0️⃣ ❓ @mastercardindia pic.twitter.com/B9ZqBKmqBH
— BCCI (@BCCI) January 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)