महिला अंडर-19 विश्वचषक 2023 ची दुसरी फेरी म्हणजेच सुपर सिक्स सुरू झाली आहे. टीम इंडियाचा सामना आज श्रीलंकेसोबत झाला. टीम इंडियाने श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केला आहे. टीम इंडियाची कर्णधार शेफाली वर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 20 षटकांत 9 गडी गमावून 59 धावा केल्या. श्रीलंकेसाठी विश्मी गुणरत्नेने सर्वाधिक 25 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून पार्श्वी चोप्राने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाने अवघ्या एका षटकात विकेट गमावून हा सामना पूर्ण केला. टीम इंडियाकडून सौम्या तिवारीने सर्वाधिक नाबाद 28 धावा केल्या. श्रीलंकेकडून देवमी विहंगने सर्वाधिक तीन बळी घेतले.
A thumping win for India as they move up in the Super 6 table ?
Watch the Women's #U19T20WorldCup for FREE on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions) ?
?: https://t.co/b2qCbfrjIX pic.twitter.com/PD9U2zJ59t
— ICC (@ICC) January 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)