Dead Body | Pixabay.com

पालघर (Palghar) च्या तलासरी (Talasari) मधील महालक्ष्मी मंदिराच्या (Mahalaxmi Mandir) पायर्‍या उतरताना एका 25 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवार 14 जानेवारीची आहे. हा तरूण त्याच्या कुटुंबियांसोबत देवीच्या दर्शनाला गेला होता. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मृत तरूणाचं नाव मिलन डोम्ब्रे आहे. 14 जानेवारीला तो कुटुंबासोबत महालक्ष्मीच्या दर्शनाला गेला होता. देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी तो 900 पायर्‍या चढला होता. मात्र परत येताना तो कोसळला. कुटुंबियांना मिलनचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला असावा असं वाटत आहे. परंतू Kasa Rural Hospital जेथे त्याला नेण्यात आलं होतं तेथील डॉक्टरांच्या मते मिलनच्या मृत्यूचं कारण हे ऑटोप्सीच्या अहवालानंतर समजेल असं सांगण्यात आले आहे.

पालघर मधील महालक्ष्मी मंदिर हे लोकप्रिय देवस्थान आहे. या मंदिरात विकेंडला, मंगळवारी, शुक्रवारी मोठ्या संख्येने भाविक येतात. नक्की वाचा: Wrestler Dies of Heart Attack: वडिलांचं स्पप्न भंगलं! साताऱ्यातील 14 वर्षीय पैलवानाचा सरावादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू .

मृत मिलन सोबत त्याची पत्नी आणि अन्य कुटुंबीय देखील होते. दर्शनाला जाताना मिलन हजार पायर्‍या सहज चढला मात्र पायर्‍या उतरताना त्याला त्रास झाला. त्याला अचानक उलटी झाली आणि क्षणांतच त्याची शुद्ध हरपली. मिलनच्या कुटुंबीयांनी त्याला खांद्यावर टाकून खाली आणले आणि जवळच्या रूग्णालयात नेले पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. मीडीया रिपोर्ट्स नुसार, पोटात अन्न नसताना अति उंचावर चालल्याने मिलनचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.