JNPA to Mumbai Electric Ferry Service: लवकरच जेएनपीए ते मुंबई दरम्यान सागरी मार्गाने प्रवासासाठी इलेक्ट्रिकल फेरी बोट सुरु होणार आहे. हरित सागर योजनेअंतर्गत, मुंबईमधील गेटवे ऑफ इंडिया आणि भाऊचा धक्का ते जेएनपीए न्हावा शेवा मार्गावर इलेक्ट्रिक फेरी सेवा सुरू होणार आहे. या बोटीच्या दररोज 6 ते 10 फेऱ्या असतील. ही सेवा सर्व हंगामात संपूर्ण मुंबई हार्बरवर चालवली जाईल. एकूण 24 पॅक्स क्षमतेसह असलेली ही बोट प्रवासाचा वेळ जवळजवळ 20-30 मिनिटांनी कमी करेल. ही नवीन इलेक्ट्रिक बोट वातानुकूलित आसन व्यवस्थेसह सुसज्ज असेल. जवाहरलाल नेहरू पोर्ट मुंबईशी अखंडपणे जोडणे, प्रत्येकासाठी वाहतूक अधिक सोयीस्कर बनवणे हा या सेवेमागील उद्देश आहे. (हेही वाचा: Mumbai Metro Update: मुंबईत मेट्रो लाइन 3 च्या कामाला वेग; MMRC च्या MD अश्विनी भिडे यांनी केली वरळी आणि आचार्य अत्रे चौक स्थानकांची पाहणी)

JNPA to Mumbai Electric Ferry Service: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)