Team India Victory Parade: टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना 29 जून रोजी खेळला गेला. या सामन्यात भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा सात धावांनी पराभव करून दुसऱ्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषक विजेतेपदावर कब्जा केला आहे. टीम इंडियाचे मायदेशात सकाळी भारतात जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेवुन दिल्लीहून मुंबईत पोहोचली. आता नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपनडेक बसमध्ये भारतीय संघाची विजयी मिरवणुक सुरु झाली असुन ते मरीन ड्राइव्हवरून वानखेडे स्टेडियमला पोहचले आहे. तिथे गेल्यावर टीम इंडियाने ट्रॉफीसोबत डान्स केला ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Virat, Rohit and Hardik dancing at the Wankhede stadium. 🇮🇳🏆pic.twitter.com/tZpengKCUh
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)