भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) मंगळवारी टाटा इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 च्या प्लेऑफ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. आयपीएल 2025 चा पहिला क्वालिफायर सामना न्यू चंदीगडमधील न्यू पीसीए स्टेडियमवर खेळला जाईल. अव्वल दोन क्रमांकाचे संघ गुरुवार, 29 मे रोजी खेळतील. शुक्रवार, 30 मे रोजी याच मैदानावर एक रोमांचक एलिमिनेटर सामना खेळला जाईल. क्वालिफायर 2 चा रोमांचक सामना तसेच ग्रँड फायनल, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. टाटा आयपीएलच्या 18 व्या हंगामाची बहुप्रतिक्षित अंतिम लढत मंगळवार, 3 जून रोजी होणार आहे. आतापर्यंत, तीन संघांनी प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे- गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज. अंतिम स्थानासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये जोरदार स्पर्धा आहे.

दुसरीकडे, आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा शेवटचा देशांतर्गत लीग सामना (आरसीबी विरुद्ध एसएचआर) बंगळुरूहून लखनऊला हलवण्यात आला आहे. आता सनरायझर्स हैदराबाद आणि बंगळुरू यांच्यातील सामना 23 मे रोजी लखनौमध्ये खेळला जाईल. आरसीबीचा शेवटचा लीग सामना 27 मे रोजी एकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स (एलएसजी) विरुद्ध खेळण्याचा कार्यक्रम आहे. हवामान खात्याने गुरुवारपर्यंत बेंगळुरूमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता आणि ऑरेंज अलर्ट जारी केला होता, त्यामुळे हा कार्यक्रम बदलण्यात आल्याचे बोलले जात आहे. (हेही वाचा: IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा)

TATA IPL 2025 Playoffs Schedule:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)