आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 मध्ये गतविजेता वेस्ट इंडिज (West Indies) संघाच्या पराभवाची मालिका सुरूच आहे. गट 1 मधील सुपर-12 च्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (South Africa) 8 विकेटने मात करून स्पर्धेत आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. विंडीजने दिलेल्या 144 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकाने रॅसी व्हॅन डर डुसेन  (Rassie van der Dussen) आणि एडन मार्करमच्या (Aiden Markram) अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर विजय मिळवला. व्हॅन डर डुसेन 43 धावा आणि मार्करम 50 धावा करून नाबाद राहिला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)