लखनौच्या एकना स्टेडियमवर श्रीलंकेने नेदरलँड्सचा पाच गडी राखून पराभव (SL Beat NED) करून या विश्वचषकात आपला विजय नोंदवला आहे. विश्वचषकातील चौथ्या सामन्यात श्रीलंकेला पहिला विजय मिळाला. तत्पूर्वी, नेदरलँडने श्रीलंकेला 263 धावांचे लक्ष्य दिले होते. श्रीलंकेच्या संघाने 48.2 षटकात 5 विकेट गमावत 263 धावा करत सामना जिंकला. श्रीलंकेच्या विजयाची हिरो सादिरा समरविक्रमा होता. सदीरा समरविक्रमा 107 चेंडूत 91 धावा करून नाबाद परतला. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार मारले. नेदरलँडसाठी आर्यन दत्त हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. आर्यन दत्तने 10 षटकांत 44 धावांत 3 फलंदाज बाद केले.
Dhananjaya de Silva falls with Sri Lanka just five runs away from their first win of the tournament #NEDvSL #CWC23
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)