200-Year-Old Condom At Dutch Museum: नेदरलँड्सच्या संग्रहालयात तब्बल 200 वर्षे जुन्या कंडोमचे प्रदर्शन; मेंढीच्या आतड्यापासून तयार केला होता

सुमारे 200 वर्षे जुना, 1830 च्या सुमारास मेंढीच्या आतड्यापासून बनवलेला कंडोम या संग्रहालयाच्या कला संग्रहाचा भाग बनला आहे. हा कंडोम केवळ गर्भनिरोधक साधन नसून, त्यावर कोरलेल्या कामुक चित्रकलेमुळे तो 19व्या शतकातील सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा एक दुर्मीळ नमुना आहे.

200-Year-Old Condom At Dutch Museum: नेदरलँड्सच्या संग्रहालयात तब्बल 200 वर्षे जुन्या कंडोमचे प्रदर्शन; मेंढीच्या आतड्यापासून तयार केला होता
200-Year-Old Condom At Dutch Museum

नेदरलँड्सच्या अ‍ॅमस्टरडॅममधील विश्वविख्यात रिज्सम्युझियम (Rijksmuseum) संग्रहालयात सध्या एक असामान्य आणि ऐतिहासिक वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. सुमारे 200 वर्षे जुना, 1830 च्या सुमारास मेंढीच्या आतड्यापासून बनवलेला कंडोम या संग्रहालयाच्या कला संग्रहाचा भाग बनला आहे. हा कंडोम केवळ गर्भनिरोधक साधन नसून, त्यावर कोरलेल्या कामुक चित्रकलेमुळे तो 19व्या शतकातील सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा एक दुर्मीळ नमुना आहे. या कंडोमवर एका नन आणि तीन धर्मगुरूंचे चित्र आहे, जे ग्रीक पौराणिक कथेतील ‘जजमेंट ऑफ पॅरिस’चा संदर्भ देते. 3 जून 2025 पासून ‘सेफ सेक्स?’ या प्रदर्शनात हा कंडोम ठेवण्यात आला असून, तो नोव्हेंबर 2025 च्या अखेरीपर्यंत पाहता येईल.

हा कंडोम सुमारे 1830 मध्ये बनवला गेला असून, तो मेंढीच्या आतड्यापासून तयार केला गेला आहे, असे संग्रहालयाच्या तज्ज्ञांनी सांगितले. त्याची लांबी 20 सेंटीमीटर (7.9 इंच) आहे, आणि त्यावर एक कामुक चित्र कोरलेले आहे, ज्यामध्ये एक नन तीन धर्मगुरूंच्या उघड्या अवयवांकडे बोट दाखवत आहे. या चित्राखाली फ्रेंच भाषेत ‘व्हॉइला, मॉन चॉइक्स’ (Voila, mon choix) म्हणजे ‘हा माझा निवड’ असा मजकूर लिहिलेला आहे. संग्रहालयाच्या क्युरेटर जॉयस झेलेन यांनी सांगितले की, हे चित्र ग्रीक पौराणिक कथेतील पॅरिस या राजकुमाराने तीन देवींमधून सर्वात सुंदर देवी निवडण्याच्या कथेचा उपहासात्मक संदर्भ आहे. याशिवाय, हे चित्र धर्मगुरूंच्या ब्रह्मचर्याचा उपहास करते, ज्यामुळे हा कंडोम त्या काळातील विनोद आणि बंडखोरीचे प्रतीक ठरतो. (हेही वाचा: Ablaze for Refusing Sex: सेक्सला नकार मिळताच संतापला पती, पत्नीसोबत केले भयानक कृत्य)

200-Year-Old Condom At Dutch Museum:

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 09, 2025 10:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).