Ablaze for Refusing Sex: सेक्सला नकार मिळताच संतापला पती, पत्नीसोबत केले भयानक कृत्य
मुंबईच्या चेंबूर परिसरात एका 46 वर्षीय पुरूषाला पत्नीने लैंगिक मागणी नाकारल्याने तिला जाळून टाकल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. महिला 70 % जळाली आहेत आणि तिची प्रकृती गंभीर आहे.
Chembur Crime News: शारीरिक संबंध ठेवण्यास नकार (Husband-Wife Physical Relationship) दिल्याने मुंबईतील एका व्यक्तीने आपल्या पत्नीस जाळल्याची घटना घडली आहे. ही घटना चेंबुर परिसरात शुक्रवारी (30 मे) दुपारी घडली. आरसीएफ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश आव्हाडने त्याची पत्नी कामावर जाण्याच्या तयारीत असताना तिच्याशी शारीरिक सेक्स (Sex) करण्याचा आग्रह धरला होता. घरकाम करणाऱ्या महिलेने उशीर होत असल्याचे सांगून त्याची मागणी नाकारली (Refusing Sex). त्यामुळे संतापलेल्या पतीने तीस पेटवून दिले.
लैंगिक संबंधांवरून वाद, नंतर हिंसक कृती
दिनेश आव्हाड (वय 46) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, पत्नीस सायन रुग्णालयात दाखल केले आहे. आव्हाडने केलेल्या भयानक कृत्यात त्याची 38 वर्षीय पत्नी 70% भाजली आहे. आरसीएफ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश आव्हाड याने पत्नीला लैंगिक संबंधांसाठी आग्रह केला. मात्र, ती कामावर जायला निघाली असल्याने तिने नकार दिला. या नकारावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला.
पत्नीने केरोसीन ओतताच पतीने ओढली काडी
वाद वाढल्यानंतर महिलेने रागाच्या भरात स्वतःवर केरोसीन ओतून घेतले. ती स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न करत होती, मात्र तिला जळती काडी लावता आली नाही. यावेळी पतीने गॅसवर कागद पेटवून तो तिच्यावर फेकला. त्यामुळे ती गंभीररीत्या भाजली.
महिला 70 टक्के भाजलेली, स्थिती चिंताजनक
महिलेला तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ती सुमारे 70 टक्के भाजली असून तिची प्रकृती सध्या चिंताजनक परंतु स्थिर आहे. दरम्यान, घटनेच्या वेळी घरात त्यांच्या पाच प्रौढ मुलांपैकी कोणी होते का, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पीडितेच्या तक्रारीवरून आरसीएफ पोलिसांनी आरोपी दिनेश आव्हाडविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत हत्या करण्याचा प्रयत्न आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे. ही घटना पुन्हा एकदा घरगुती हिंसाचाराचे भयावह वास्तव समोर आणते. महिलांच्या सुरक्षिततेसाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.
कौटुंबीक हिंसाचाराच्या घटना अनेकदा मानवी मूल्यांची पायमल्ली करताना दिसतात. घटनेतील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षेची मागणी केली जाते. मात्र, काही काळाने प्रकरण निवळले जाते. परिणामी समाजात सातत्याने अशा घटना घडल्याचे पाहायला मिळते, अशी चिंता सामाजिक परिस्थितीचे भाष्यकार व्यक्त करतात.
(The above story first appeared on LatestLY on Jun 01, 2025 03:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

