मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांत एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. ७ ऑगस्ट रोजी या जलाशयांत १२ लाख ८० हजार ९३१ दशलक्ष लिटर इतका साठा नोंदवला गेला, जो एकूण गरजेच्या ८८.५० टक्के आहे. याआधी ३ ऑगस्ट रोजी हाच साठा ९०.०६ टक्के इतका होता. म्हणजेच अवघ्या चार दिवसांत साठ्यात दीड टक्क्याची घट झाली आहे. मागील तीन दिवसांपासून तलाव क्षेत्रात पावसाचे प्रमाण घटल्याने साठा वाढण्याऐवजी कमी होत असल्याचे चित्र आहे.
🚰 मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांचा आज सकाळी ६ वाजेपर्यंतचा अहवाल #MyBMCUpdates pic.twitter.com/VKY2lORp3r
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 8, 2026
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)