Abu Dhabi कडून भारतीय पर्यटकांसाठी मोफत UAE Entry Visa योजना सुरू
अबुधाबीच्या सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाने भारतीय पर्यटकांसाठी नवी योजना जाहीर केली असून, ठराविक अटी पूर्ण करणाऱ्या बुकिंगवर यूएई प्रवेश व्हिसाचा संपूर्ण खर्च उचलला जाणार आहे. ही योजना ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.
Free UAE visa for Indian tourists: अबुधाबी (Abu Dhabi) येथे सुट्टी घालवण्याचे नियोजन करणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी एक नवी सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ठराविक अटींची पूर्तता करणाऱ्या बुकिंगवर पर्यटकांना यूएई प्रवेश व्हिसा मोफत मिळणार आहे. डिपार्टमेंट ऑफ कल्चर अँड टुरिझम – अबुधाबी (डीसीटी अबुधाबी) या संस्थेनेAbu Dhabi DCT scheme सुरू केली असून, ती १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत लागू राहणार आहे. या योजनेत सुरुवातीच्या टप्प्यात जास्तीत जास्त वीस हजार व्हिसांचा समावेश केला जाणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी पर्यटकांना अधिकृत ट्रॅव्हल पार्टनर किंवा ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सीमार्फत बुकिंग करणे आवश्यक आहे.
Free UAE visa for Indian tourists: Abu Dhabi launches new holiday offer https://t.co/KbSoBfjcoG pic.twitter.com/BDerlxDUHo
— Gulf News (@gulf_news) August 10, 2026
योजनेची व्याप्ती आणि अटी
या योजनेत सुरुवातीच्या टप्प्यात जास्तीत जास्त वीस हजार व्हिसांचा समावेश केला जाणार आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी पर्यटकांना अधिकृत ट्रॅव्हल पार्टनर किंवा ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सीमार्फत बुकिंग करणे आवश्यक आहे.
बुकिंगमध्ये अबुधाबीतील हॉटेलमध्ये किमान सलग तीन रात्रींचा मुक्काम आणि भारतातून जाणारी-येणारी विमान तिकिटे समाविष्ट असणे बंधनकारक आहे. या अटी पूर्ण करणाऱ्या पर्यटकांच्या व्हिसाचा संपूर्ण खर्च डीसीटी अबुधाबीकडून उचलला जाईल, त्यामुळे प्रवासाचा सुरुवातीचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, पर्यटक स्वतः या योजनेसाठी थेट अर्ज करू शकत नाहीत. ही सवलत केवळ अधिकृत ट्रॅव्हल पार्टनर आणि ऑनलाइन ट्रॅव्हल एजन्सींमार्फतच उपलब्ध असेल.
योजना प्रत्यक्षात कशी राबवली जाणार
सहभागी ट्रॅव्हल पार्टनर्सना या योजनेसाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे डीसीटी अबुधाबीने नेमलेल्या डेस्टिनेशन मॅनेजमेंट कंपनीमार्फत (डीएमसी) काम करणे, ज्यामध्ये व्हिसाचा खर्च थेट डीसीटी अबुधाबीकडून उचलला जाईल.
दुसरा पर्याय म्हणजे ट्रॅव्हल पार्टनर्स त्यांच्या आधीच्या डीएमसी भागीदारांसोबत काम सुरू ठेवू शकतात. अशा प्रकरणांत, प्रत्येक जारी झालेल्या व्हिसामागे डीसीटी अबुधाबी २८५ दिरहम इतकी रक्कम परत करेल.
ही योजना भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील पर्यटन संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 10, 2026 04:54 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

