देशात सुरू असलेल्या गोंधळामुळे विलंब झाल्यानंतर, श्रीलंका क्रिकेटने यूएईमध्ये होणाऱ्या आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी 20 जणांचा संघ जाहीर केला असुन दासुन शनाकाकडे संघाची कमान देण्यात आली आहे. निवड समितीने अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश चंडिमलचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या भानुका राजपक्षेलाही संघात ठेवण्यात आले आहे. श्रीलंकेने आपल्या संघात चार फिरकीपटूंचा समावेश केला आहे. वानिंदू हसरंगा, महिष टेकश्ना, जेफ्री वेंडरसे आणि प्रवीण जयविक्रम यांची निवड करण्यात आली आहे. श्रीलंका पहिल्या फेरीत 27 ऑगस्टला अफगाणिस्तान आणि 1 सप्टेंबरला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे.

श्रीलंकेचा संघ : दासुन शनाका (कर्णधार), धनुष्का गुनाथिलका, पथुम निसांका, कुशल मेंडिस, चरित अस्लंका, भानुका राजपक्षे, अशेन बंदारा, धनंजय डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, महिष टेकशाना, जेफ्री वांडरसे, प्रवीण चरामी, बृहन्मान चरामा, डी. फर्नांडो, मदुशांका, मथिशा पाथिराना, दिनेश चांडीमल, नुवानिंदू फर्नांडो आणि कसून राजिता

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)