IND vs SA 1st Test Day 3: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जात आहे. आज (गुरुवार) सामन्याचा तिसरा दिवस आहे. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या दिवसाची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात 256 धावा अशी होती. त्यांनी पहिल्या डावात 408 धावा केल्या होत्या. भारताने पहिल्या डावात 245 धावा केल्या होत्या. अशा प्रकारे आफ्रिकन संघाने पहिल्या डावात 163 धावांची आघाडी मिळवली. दक्षिण आफ्रिकेकडून डीन एल्गरने पहिल्या डावात सर्वाधिक 185 धावा केल्या. मार्को जॅन्सनने नाबाद 84 आणि डेव्हिड बेडिंगहॅमने 56 धावा केल्या. टोनी डी जॉर्जी 28 आणि गेराल्ड कोएत्झी 19 धावांवर नाबाद राहिला. भारताकडून जसप्रीत बुमराहने चार आणि मोहम्मद सिराजने दोन विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा आणि रविचंद्रन अश्विन यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)