IND vs SA 1st Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्कवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघ खेळाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात 245 धावांवरच मर्यादित राहिला. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली पण डीन एल्गर आणि टोनी डी जोर्जी यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी झाली. जसप्रीत बुमराहने ही जोडी फोडून भारताला सामन्यातील दुसरे यश मिळवून दिले. मात्र, या विकेटपूर्वी विराट कोहलीने असे काही केले ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान, 27 वे षटक संपल्यानंतर विराट कोहलीने अचानक स्टंपचा बेल बदलला. यानंतर 28वे षटक टाकण्यासाठी आलेल्या जसप्रीत बुमराहने सहाव्या चेंडूवर टोनी डी जोर्जीची विकेट घेतली, जो 62 चेंडूत 28 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. (हे देखील वाचा: IND vs AFG T20 Series: रोहित शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार? हिटमॅन अफगाणिस्तान मालिकेत होऊ शकतो कर्णधार)
पाहा व्हिडिओ
Black magic ✨ ✨https://t.co/FI9PJJiFKlpic.twitter.com/VXvDVXSuRV
— Johns. (@RevSportsz) December 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)