बांगलादेशविरुद्धच्या विश्वचषकातील 17व्या सामन्यात भारताने (India Beat Bangladesh) सात विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) नाबाद शतक तर शुभमन गिलने (Shubman Gill) अर्धशतक झळकावले. यासह भारताने या स्पर्धेत सलग चौथा सामना जिंकला आहे. बांगलादेशविरुद्धचा हा सामना जिंकल्यानंतर बीसीसीआयने (BCCI) ड्रेसिंग रूमचा व्हिडिओ सोशल मीडियावर जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये टीमचा युवा सलामीवीर शुभमन गिल कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) मुलाखत घेताना दिसत आहे. व्हिडिओची सुरुवात शुभमन गिलपासून होते. गिलने संघाचा कर्णधार रोहित शर्माला प्रश्न विचारताना दिसुन येतो.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)