IND vs SA 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने गोलंदाजीपूर्वी आफ्रिकन संघावर दबाव आणला. पण त्यानंतर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय टॉप ऑर्डरने तशी कामगिरी केली नाही. रोहित शर्मा 39 धावा करून बाद झाला, तर पुन्हा एकदा श्रेयस अय्यर (Shryas Iyer) मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला आणि त्याच्या जागी अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) संधी देण्याची मागणी चाहत्यांनी सुरू केली. तत्तपुर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 55 धावांवर आटोपला. तसेच, आजच्या दिवशी दुसरीकडे भारताचा पहिला डाव 153 धावांवर गारद झाला आणि 98 धावाची आघाडी घेतली. भारताने शेवटच्या पाच फलंदाजाना एकही धाव न करता शुन्यावर विकेट गमावल्या. (हे देखील वाचा: SuryaKumar Yadav ला ICC कडून मिळू शकतो वर्षातील सर्वात मोठा पुरस्कार, 'या' खेळाडूंशी होणार स्पर्धा)

पाहा ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)