नागपूर: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Vidarbha Cricket Association Stadium, Nagpur) खेळला जात आहे. 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीला बळकटी देण्यासाठी भारतीय संघासाठी ही मालिका महत्वाची आहे. यापूर्वी, टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत इंग्लंडचा 4-1 असा पराभव केला होता. तत्तपुर्वी, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने भारतासमोर 249 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यानंतर, लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने पुनरागमन करताच शानदार अर्धशतक झळकावले आहे. भारताचा स्कोर 109/2

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)